Cardinal Principles Prarthana Samaj
ब्राह्म धर्मतत्त्वेPrarthana Samaj proclaims Monotheism. Following are the cardinal principles of Prarthana Samaj.
(प्रार्थना समाज एकेश्वरी असून पुढील धर्मतत्त्वांचा पुरस्कार करतो.)
१. परमेश्वराने हे जग उत्पन्न केले. तोच एक खरा देव, त्या शिवाय दुसरा देव नाही. तो नित्य, ज्ञानस्वरूप, अनंत, कल्याणनिधान, आनंदमय, निरवयव, निराकार, एकच, अद्वितीय, सर्वांचा नियंता,सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्ती, कृपानिधी, प्रेमस्वरूप, परमपवित्र, पतितपावन असा आहे.
२. केवळ त्याच्याच उपासनेच्या योगे येथे व परलोकी शुभ प्राप्त होते.
३. त्याच्यावर प्रीती, पूज्यत्वबुद्धी व अनन्यभाव ठेवून त्याप्रमाणे त्याचे मनाने भजन पूजन करणे व त्यास प्रिय अशी कृत्ये करणे हीच त्याची उपासना होय.
४. मूर्ती व इतर जड पदार्थ यांची पूजा किंवा प्रार्थना करणे हा ईश्वरोपासनेचा खरा प्रकार नव्हे.
५. परमेश्वर सावयव रूपाने अवतार घेत नाही व कोणताही एक ग्रंथ साक्षात् किंवा सर्वांशीं प्रमाण नाही.
६. सर्व मनुष्ये एका परमेश्वराची लेकरे आहेत, म्हणून भेद न राखिता परस्परांशी बंधुभावाने वागावे हे ईश्वरास प्रिय आहे, आणि हे मनुष्याचे कर्तव्य आहे.